र्हाद (र्हेडियम) - ही एक प्लातिन धातु
र्हाद (र्हेडियम) - ही एक प्लातिन धातु असून हिचा प. भा. अं. १०३ आहे. ही धातु प्लातिन धातूशीं संयुक्त स्थितीत असतांना वोलॅस्टन यानें शोधून काढली. प्लातिनच्या कच्च्या धातूपासून प्लातिन हर-प्लातिनित रूपानें काढून टाकल्यावर मिळणार्या द्रावणावर लोहाची क्रिया केली असतां तें द्रावण विघटित होतें व सांका मिळतों. या साक्यांत नत्राम्ल टाकून तप्त करतात व नंतर दाहक पालाशदाह एका लोखंडी मुशींत (कुसिबल) ओतून पुन्हां त्यास उष्णता देतात. उप्णता देऊन मिळालेला पदार्थ मिठाशीं मिश्रित करून हराच्या वातावरणामध्यें तापवितात, व नंतर त्यांत थोडेसें नत्राम्ल टाकून अन्न-हरिद टाकलें असतां ऐंद्र असल्यास सांकारूपानें खाली बसतें व र्हाद त्याच्या अन्नहरिद रूपानें वरील द्रावणांत असतो. या धातूचें विशिष्ट गुरूत्व ११ ते १२ पर्यंत असून चकाकी स्फटासारखी असते. त्याची बरीच प्राणिदें माहीत आहेत. ही धातु गंधकासह तप्त केल्यास तिचें गंधकिद मिळतें व याच गंधकिदाचें प्राणिदीकरण केलें असतां र्हाद-गंधकित तयार होतें.